Description
साधारणपणे तिसरी-चौथी आणि त्याच्या पुढील वयोगटासाठी
हा व्याकरण खेळ आहे. यामध्ये
१. अनुस्वारांच्या शब्दात त्याची फोड कशी करायची हे सोप्या खेळातून मुलांना उलगडत
जाणार आहे. उदा. पांडू या शब्दाच्या फोडीत ‘ण’ येणार आहे तर पंगत या शब्दाच्या फोडीत
‘ङ’ येणार. याप्रमाणेच फोडीत न,म,ञ आणि नुसता अनुस्वार येऊ शकतो.
२. यामुळे प्रत्येक अनुस्वारांच्या शब्दांची फोड सारखीच असते असे नाही, हे स्पष्ट होईल.
३. याशिवाय अनुस्वार वेगळा आणि शिरोबिंदू वेगळा ही सुद्धा संकल्पना स्पष्ट होईलच.
४. संस्कृत उच्चारासाठी तसेच स्कॉलरशिप च्या परीक्षेसाठी उपयुक्त साधन.
५. यामध्ये सरावासाठी ३५ शब्द आहेत.
Reviews
There are no reviews yet.