Description
एकवचन- अनेकवचन
१. बालवाडीच्या पहिल्या टप्प्यावर एकवचन – अनेकवचन चा तोंडी सराव झालेला असतो. पहिलीच्या दुसऱ्या टप्प्यावर न बदलणारे वचन याची ओळख करून द्यायची आहे.
२. यामध्ये सरावासाठी ३० शब्द दिले आहेत.
३. या साधनात आगगाडीच्या दोन खिडक्यात एकवचन आणि अनेकवचन चे शब्द मुलांनी वाचून वर्गीकरण करायचे आहे. गाडीच्या इंजिनमध्ये न बदलणारे शब्द ठेवायचे आहेत.
४. खेळाच्या माध्यमातून वाचन,वर्गीकरण होऊन एकवचन अनेकवचन ही संकल्पना स्पष्ट होणार आहे.
चित्रगोष्टी : यामध्ये चार गोष्टींचा समावेश आहे. प्रत्येक गोष्टीची चार कार्ड्स आहेत.
गोष्टीतील कार्डांचा क्रम मुलांनाच लावायला द्यायचा आहे. मुले ज्या क्रमाने कार्ड
लावतील त्याप्रमाणेच त्यांनी गोष्ट सांगायची आहे. थोडक्यात मुलांना त्यांची
कल्पनाशक्ती वापरू द्यायची आहे. गोष्ट आपल्या डोक्यात असते तशीच मुलांनी
सांगणे अपेक्षित नाही तसा पालक-शिक्षकांनी आग्रह धरू नये.
सगळ्यात महत्वाचे : गोष्टीला तात्पर्य असू नये कारण मुले त्यातून तेवढी एकच गोष्ट
शिकत नसतात. शिवाय मुलांना ‘तात्पर्य’ या शब्दाचा अर्थही माहीत नसतो.
एका गोष्टीतून मुले इतर दहा गोष्टी शिकून जातात.
Reviews
There are no reviews yet.