Description
तो-ती-ते साधन (स्त्रीलिंग-पुल्लिंंग-नपुसकलिंग)
मुलांना उच्चार करायला, काम करायला सोपे जावे म्हणून याचे नाव आपण
तो-ती-ते ठेवले आहे. यामध्ये प्रत्येकी १२ शब्दचित्र कार्ड्स आहेत म्हणजे
एकूण ३६ शब्दचित्र कार्ड्स आहेत.
मुलांनी या कार्डांचे स्त्रीलिंगी-पुल्लिंग-नपुसकलिंग असे वर्गीकरण करायचे आहे.
या कार्डांचे सराव झाले, मुलांना संकल्पना कळली की त्याच्या दृढीकरणासाठी
आजूबाजूच्या वस्तू, त्यांच्या दप्तरातील वस्तूं, स्वयंपाकघरातील वस्तू अशांचा सराव घ्यावा.
वाचन पट्ट्या
यामध्ये एकूण २० वाचनपट्ट्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो.
वाचन सुलभीकरणासाठी चित्र आणि शब्द याचा समावेश केला आहे. पूर्ण वाक्य वाचनाच्या
सरावासाठी हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. तो-ती-ते जसे शब्दांसाठी वापरून सराव होणार
आहे त्याच पद्धतीने या सगळ्या वाक्यात हा-ही-हे पासूनची वाक्ये आहेत.
चित्रवाचना मध्ये दुसरी पायरी पूर्ण वाक्यात वाचनाची आहे, त्यासाठी या साधनाचा उपयोग होतो.
Reviews
There are no reviews yet.