Description
विरुद्धार्थी पझल :
विरुद्धार्थी पझलमध्ये एकूण १२ जोड्या आहेत. सुरुवातीला मुले समान
रंगांच्या जोड्या लावतील म्हणजे कार्डाची जोडी रंगांवरून लावतील.
हळूहळू शब्दांचा सराव झाल्यावर शब्द वाचून जोडतील.
इतिहासाची सापशिडी :
हा खेळ बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पूर्ण पुस्तकावर आधारित आहे.
१. या खेळात एका वाक्यात आणि गाळलेल्या जागा भरा याचा सराव होतो.
२. नेहमीच्या सापशिडीसारखी रचना, सोंगट्या आणि फासा.
३. एकूण ४४ प्रश्न आणि बक्षीस म्हणून ९ किल्ले आहेत.
४. चार मुले एकत्रित हा खेळ खेळू शकतात.
* खेळाचे नियम : खेळताना प्रश्नांचा गठ्ठा पालथा टाकायचा आहे. खेळत
शिडीपर्यंत पोहोचल्यावर एक प्रश्न काढून समोरच्याच्या हातात द्यायचा.
समोरच्याने तो प्रश्न विचारायचा. खेळणार्याचे त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर
आले तर शिडी चढायला मिळणार आणि तिथे असलेला किल्लाही बक्षीस
मिळणार आहे. तसेच सापाच्या तोंडापाशी आल्यावर एक प्रश्न काढायचा.
त्याचे उत्तर बरोबर आले तर साप गिळणार नाही. चुकले तर मात्र साप
नक्की गिळणार, म्हणजे उतरून खाली येणार.
* शिवाजी महाराज ज्या क्रमाने किल्ले जिंकत गेले आहेत साधारण तोच क्रम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
* प्रत्येक प्रश्न कार्डावर त्याच्याच खाली लहान अक्षरात उत्तरे लिहिली आहेत.
* खेळत खेळत पूर्ण पुस्तकाचा सराव होणार आहे.
Reviews
There are no reviews yet.