Description

Spread the love

हा दहा पाट्यांचा संच आहे.
यामध्ये दोन अक्षरी शब्दांच्या चार पाट्या, तीन अक्षरी शब्दांच्या चार पाट्या,
चार अक्षरी शब्दांच्या दोन पाट्या अश्या एकूण १० पाट्या आहेत.
याबरोबर ३ प्रकारच्या लाकडी खिडक्या आहेत. दोन अक्षरांसाठी,
तीन अक्षरांसाठी आणि चार अक्षरांसाठी. खिडकीचा वापर करुन मुलांनीच
शब्द शोधायचे आहेत. खिडकी वापरून शब्द शोधून झाले की खिडकीत
बसत नसलेले पण शब्द तयार करू शकतात.
असे एका पाटीतून साधारण १०० शब्द निघू शकतात, म्हणजे दहा पाट्यातून
किमान १००० शब्द मुलं शोधून काढतात. काही शब्द मुलांना नव्याने
माहीत होतात. नवीन मिळालेले शब्द मुले त्यांच्या बोलण्यात वापरून बघत
असतात. वेगवेगळ्या पाट्यातून अक्षरे घेऊनही मुले शब्द तयार करू शकतात.