Description

Spread the love

साधारणपणे तिसरी आणि चौथीच्या टप्प्यावरचा हा व्याकरण खेळ आहे.
१. यामध्ये सरावासाठी ६० शब्द आहेत. मुलांना कार्डांच्या माध्यमातून आधी सामान्यनाम
ओळख करून द्यायची आहे. त्यापुढे विशेष नाम जोडायला द्यायचे आहे, ती प्रत्येकी ३ आहेत.
२. विशेषनाम मुले कितीही पुढे सांगू शकतात. उदा. सामान्यनाम फळ- विशेष नाम-
आंबा,पेरू,चिक्कू आणि पुढे कितीही फळांची नावे मुले सांगू शकतात.
३. याचा सराव झाल्यावर मुलांना उलट पद्धतीनेही विचारू शकतो.
उदा. आंबा चे सामान्य नाम काय? यापद्धतीने…
४. याशिवाय मुले स्वतः सुद्धा सामान्यनाम-विशेषनाम शोधून काढू शकतात.