Description

Spread the love

सर्व वयोगटातल्या पालकांची एकच तक्रार असते मुलं नीट ऐकतच नाहीत, त्यातल्या
त्यात सूचनांकडे तर पूर्ण दुर्लक्ष करतात आणि पुढे हीच सवय लागते. लहानपणापासून
खेळाच्या माध्यमातून ही ऐकण्याची सवय मुलांना लागली तर मुलं आणि पालक
यांच्यासाठी ते उत्तमच ठरेल. खेळ म्हटलं की मुलेही पटकन तयार होतात.
चला तर मग हा खेळ कसा खेळायचा तेही बघुयात.
१. यामध्ये एकूण ४८ सूचना आहेत. सुरुवातीला एक वाक्याच्या नंतर नंतर
काठिण्य पातळी वाढत नेण्याच्या आहेत.
२. ज्या सूचना निवडणार आहोत त्यातील साहित्य जवळपास आहे की नाही
याची खात्री करून घ्यायची आहे.
उदा. डबा, पिशवी, वाटी, चमचा असे सूचनांनुसार आवश्यक साहित्य.
३. सुरुवातीला एक वाक्याच्या सूचनाच घ्यायच्या. त्या पालथ्या टाकायच्या.
४. मुलांना त्यातील २ सूचना उचलायच्या आहेत आणि त्या मोठ्याने वाचायच्या आहेत.
५. ज्या क्रमाने वाचल्या त्याच क्रमाने कृती करायची आहे.
६. दोन सूचनांचा सराव झाल्यावर सूचना वाढवत न्यायच्या आहेत. मुले छान ८
सूचनांपर्यंत पोहोचतात. गटात (शाळेत)/ घरात (सगळे मिळून)हा खेळ
खेळायचा आहे. कृतीसहित पूर्ण सूचना पाळल्या तर बाकीच्यांनी हात वर
करायचा आहे, एक जरी क्रम चुकला तर हात जमिनीवर ठेवायचा आहे.
थोडक्यात खेळ खेळताना सगळ्यांनाच लक्ष द्यावे लागणार आहे.